
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
साई सोशल अॅण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने चित्रपट, व्यवसाय, शिक्षण, समाजकार्य, क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच, दहावी आणि बारावीच्या गुणवंत शंभर विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे झाला. प्रा. डॉ. बिरेन दवे, योगेश गोंधळे व सुनील हिरूरकर, अभिनेत्री स्पेंटा पटेल, डॉ. भावना मंगेश यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. नाजीम शेख, प्रमोद शिंदे, सागर जाधव, डॉ. मदन कोठुळे, प्रा. डॉ. वृशाली रंधीर, उषा भालेराव धुमाळ, मनोहर ताठवडकर, शेहजाद पटेल, सिकंदर मुलाणी, साजीद शेख, बन्सी आटवे, डॉ. जोहर चुनावाला, डॉ. जान्हवी इंगळे, पूनम पवसे तसेच, अस्तित्व कला मंचच्या प्रतिनिधींना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान यांनी संयोजन केले.



