पुणेचिंचवडमहाराष्ट्र

दलित पॅथर अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी रफिक कुरेशी यांची निवड

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

दलित पँथर संघटनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रफिक कुरेशी यांची निवड झाली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी दिले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

रफिक कुरेशी हे महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. ते पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात सक्रिय आहेत. सर्वधर्मीय उपक्रम आणि कार्यक्रमातील त्याचा सहभाग उल्लेखनीय आहे. ते दरवर्षी विविध सामाजिक आणि विधायक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यांच्या निवडीमुळे संघटनेतील अल्पसंख्याक विभागातील कार्यकर्तांना पाठबळ मिळणार मिळेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button