
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाापालिकेच्या वतीने प्रबोधन विचार पर्वाचे कार्यक्रम सुरू आहे. निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्प उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते बुधवारी (दि.19) पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच, जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, माजी नगरसेवक मारूती भापकर, सचिन चिखले, कार्यकारी अभियंता नितिन देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर आणि नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महापालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच, शहरातील पिंपरी गाव, रहाटणी चौक, एच. ए. कॉलनी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, लांडेवाडी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा धर कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, माजी नगरसेवक संजय काटे, स्वाती काटे, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी थेरगाव, डांगे चौक आणि प्रेमलोक पार्क, चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, कार्यकारी अभियंता बाळू लांडे, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, लिपिक मंगेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उपायुक्त राजेश आगळे यांनी भोसरी येथील पीएमटी चौक, मोशी, चर्होली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी नाना मोरे, मुख्य लिपिक किसन केंगले, अभिजित डोळस उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे यांनी मोहननगर, चिंचवड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी माजी नगरसेवक मारूती भापकर, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



