कोकणक्रिडामहाराष्ट्रमावळशैक्षणिक

अंजोर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे 89 ज्येष्ठ खेळाडूंचा गौरव

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

अंजोर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 89 ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक यांचा विशेष सन्मान सोहळा घेण्यात आला. त्यात आंतराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा समावेश होता. नव्या पिढीतील खेळाडूंना ज्येष्ठांचा अनुभवाचा फायदा मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात  हॉकी, फुटबॉल, मुष्टियुद्ध, योगा, अ‍ॅथलेटिक्स, मॅरेथॉन, सायकलिंग तसेच, विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अर्जुन पुरस्कार तसेच, श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित खेळाडूंचाही समावेश होता. आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक रमेश पिल्ले, अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध प्रशिक्षक गोपाळ देवांग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध प्रशिक्षक गुंडीदास कांबळे, फुटबॉल स्पर्धेचे संयोजक एस. एस. अहलुवालिया आदींचा सन्मान करण्यात आला.

फाउंडेशनचे संस्थापक अतुल समर्थ यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सीएसआरचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. सरकारच्या विविध योजना व उपलब्ध साधनांचा योग्य उपयोग करून खेळाडूंना अधिक चांगल्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, याबाबत मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button