भोसरीचिंचवडपिंपरीपुणेमहाराष्ट्र

अठरा वर्षे पूर्ण झालेल्या तरूणांची 12 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी मोहिम

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी व जनजागृती कविशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या किंवा 18 वर्षे पूर्ण करणार्‍या पात्र तरुण व तरुणींची नवीन मतदार म्हणून नोंदणी करावी. विद्यमान मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रातील नाव, पत्ता, वय किंवा अन्य तपशिलांमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकार्‍यांनी केले आहे.

शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी तसेच, मतदार यादीतील तपशील अद्ययावत करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मोहिमेचा लाभ घ्यावा. यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात येणार आहे.

विशेषतः तरुण व प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त करणार्‍या युवा पिढीपर्यंत ही माहिती पोहोचविली जाणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिबिरोच आयोजन करून मतदार नोंदणी केली जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क महत्त्वाचा असून, 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी. यादीत नाव असलेल्या मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव व इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी.

मतदार नोंदणी व मतदार यादीतील तपशील दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे. पात्र नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपली मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत आणि भोसरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सचिन पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button