
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल, रहाटणी, पुणे येथे २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात व आदरपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मेघा विभुते मॅडम यांच्या सुंदर सूत्रसंचालनाने झाली. यावेळी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर, देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर तसेच त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
श्वेता भालेराव मॅडम यांनी इंग्रजी भाषेतून दोन्ही महान नेत्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे प्रेरणादायी भाषण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. LKG मधील निहारिका पवार आणि UKG मधील आरिका पवार यांनी इंग्रजी भाषेतून सुंदर भाषणे सादर केली.
यानंतर निशा मॅडम यांनी मराठी भाषेतून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचे आणि कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. इयत्ता तिसरीतील रुद्र पिसे आणि इयत्ता पाचवीतील दीपिका राठोड यांनी मराठी भाषेतून दोन्ही महान नेत्यांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.



