भोसरीचिंचवडपिंपरीमहाराष्ट्र

महापालिकेचे परदेश अभ्यास दौरे रद्द; आयुक्तांकडून काटकसरीचे कठोर निर्णय

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभ्यास, प्रशिक्षण किंवा शासकीय कामकाजासाठी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. नवीन परदेश दौर्‍याचे नियोजन करण्यात येऊ नये. असे कठोर निर्णय महापलिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतले आहेत.

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे तसेच, इंधन संकटामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व महापालिकांना ऊर्जा बचत, इंधन वापर नियंत्रण, खर्च नियंत्रण व कार्यपद्धती संदर्भातील उपाययोजना राबविण्याचे आदेश 13 मे 2026 च्या पत्रानुसार दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनी काटकसर करण्यासाठी वरील निर्णय घेतले आहेत. तो निर्णय सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना लागू होणार आहे.महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांचे परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत. नवीन आदेशापर्यंत तो निर्णय लागू असणार आहे.

महापालिकेकडून भाड्याने घेण्यात येणार्‍या वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाहनांना प्राधान्य देण्यात यावे. महापालिकेच्या अखत्यारीतील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्राबाबत प्राप्त प्रस्ताव, परवानग्या व संबंधित प्रशासकीय कार्यवाही प्राधान्याने निकाली काढण्यात यावी. चार्जिंग सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. शहरातील पीएनजी (पाईपड नॅचरले गॅस) वापरास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पीएनज जोडणी, वितरण व्यवस्था व संबंधित पायाभूत सुविधांबाबत प्राप्त प्रस्तावांवर प्राधान्याने कार्यवारी करण्यात यावी. संबंधित परवानग्या, ना- हरकत प्रमाणपत्रे व प्रशासकीय मंजुरीबाबची प्रक्रिया मुदतीमध्ये पूर्ण करर्‍यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करावी, असे आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button