
- पांचगणी परिसरातील सोसायटीधारकांच्या बैठकीत कांबळे यांच्या विजयाचा निर्धार !
- मतदारांचा इरादा पक्का; कांबळेंच्या नेतृत्वावर शिक्का
- पांचगणी नगरपरिषदेच्या प्रगतीसाठी मिळून काम करण्याचे कांबळेंचे आश्वासन !
पांचगणी | निर्भीडसत्ता न्यूज
पांचगणी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार दीपक कांबळे यांनी पांचगणी शहरात भेटीगाठींचा धडाका लावला आहे. पांचगणी शहरातील विकासाचा चेहरा म्हणून दीपक कांबळे हेच सक्षम पर्याय आहेत. पांचगणी नगरपरिषद मतदारसंघातील विकासकामांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणणे हे केवळ पांचगणीतील प्रत्येक मतदार नागरिकांचे कर्तव्य आहे. कांबळे यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी घराघरात आणि मनामनात ” दिपकं भाऊंना” पोहोचले आहेत. या प्रचार दौऱ्यादरम्यान कांबळे यांनी शहरामध्ये अनेक प्रभागांना भेट दिली. यावेळी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांचगणी नगरपरिषद मतदारसंघातील सर्वात विकसित आणि पर्यटन स्थळ म्हणून पांचगणीची ओळख आहे. पांचगणी हे स्मार्ट शहर करण्यासाठी विकसित व सौंदर्यात भर घालण्यासाठी तसेच विकासाला गती देण्यासाठी आणि पांचगणी नगरपरिषदेमधील सर्वत्र विकासाचा वटवृक्ष वाढविण्यासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला मिळावा ही विनंती. म्हणून मला “नारळाची बाग” या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करा. तसेच पाचगणी वासियांना संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना येणाऱ्या काळामध्ये टेबल लाईन डेव्हलपमेंट, पर्यटन स्थळाचा विकास तसेच पाणी, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाच्या कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो.
दिपक कांबळे
अपक्ष उमेदवार



