आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांचा सन्मान

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि परिसर सौंदर्यीकरणाची उत्तम अंमलबजावणी करणार्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांचा विशेष सन्मान उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहाय्यक आयुक्त अमित पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत महापालिका शहर स्वच्छतेसोबतच ते आकर्षक व सुंदर घडवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शहरातील विविध ठिकाणी कचराचे जमा झालेले ढीग साफ करून, त्याठिकाणी सौंदर्यीकरणाच्या उपक्रमामुळे शहाराच्या सौंदर्यात भर पडत आहे. त्या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
ई क्षेत्रीय कार्यालयातील सखुबाई गवळी उद्यान परिसराचे आकर्षक सौंदर्यीकरण, ड क्षेत्रीय कार्यालयातील सुदर्शननगर चौक, पिंपळे गुरव येथील सुंदर कलात्मक बदल या उपक्रमांनी परिसराचे सौंदर्य वाढवले आहे. परिसर सौंदर्यीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.
त्यामध्ये सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, शांताराम माने, श्रीराम गायकवाड, प्रभारी सहाय्यक आरोग्याधिकारी अतुल सोनवणे, मुख्य आरोग्य निरीक्षक योगेश फल्ले, शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, कोमल फर्डे, खंडेराव बैलकवाड, प्रणय चव्हाण, शैलेंद्रसिंग तंवर, गौरव गायकवाड, विकास शिरवळ आदींचा समावेश आहे.



