क्रिडाचिंचवडपिंपरीपुणेभोसरीमराठवाडामावळशैक्षणिक

औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धेत बजाज ऑटो संघ अजिंक्य

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज 
औद्योगिक क्रीडा संघटनेच्या महिला क्रिकेट स्पर्धेत बजाज ऑटो ब्ल्यू संघाने प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड संघाचा पराभव करीत विजेतेपद प्राप्त केले. तर, प्राज इंडस्ट्रीजल उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला गटाची प्रथमच बाद पद्धतीने स्पर्धा आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीच्या क्रीडांगणावर झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण संतोष सोनटक्के, अतुल काळोखे, मिलिंद बावा, नरेंद्र कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, सहखजिनदार विजय हिंगे, दयानंद नरवडे, सचिन कांबळे, राहुल कापसे, श्रीनिवास मोरे, दिनेश भुजबळ, अमित कदम, मंदार कुलकर्णी, रियाज उतावळे आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बजाज ऑटो ब्ल्यू संघाने  6 षटकात 1 बाद एकूण 70 धावा केल्या. अस्मिता मोरे हिने 27 आणि स्नेहा नाईक हिने 29 धावा करीत उत्कृष्ट फलंदाजी केली. प्राज इंडस्ट्रीज संघ 6 षटकात 3 बात केवळ 46 धावात गारद झाला. रश्मी देशमुख हिने 20 आणि मिता पडनाद हिने 12 धावा केल्या. बजाज ऑटोच्या स्नेहा नाईक हिने गोलंदाजी करताना 5 धावा देत 2 गडी बाद केले. तर, आकांक्षा दरगर हिने 8 धावा देत 1 गडी बाद केला.
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज अस्मिता मोरे (बजाज ऑटो), उत्कृष्ट गोलंदाज मिता पडनाद (प्राज इंडस्ट्रीज) तर, उत्कृष्ट खेळाडू स्नेहा नाईक (बजाज ऑटो ब्ल्यू) ठरल्या. खजिनदार प्रदीप वाघ यांनी सुत्रसंचालन केले. हरी देशपांडे यांनी आभार मानले. मंदार कुलकर्णी यांनी निवेदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button