
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरस्थिती व पाण्याचा प्रचंड तडाखा बसलेल्या भागांमध्ये प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून अद्याप मोहोळ मधील नागरिकांना सरकारची मदत पोहचली नाही त्यामुळे लोंढेवाडी या ठिकाणी मदत म्हणून पिंपरी चिंचवड शहरातून शंकर कुराडे स्पोर्ट फाउंडेशन च्या वतीने पिढीत कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आले आहे.
या वेळी शंकर कुराडे स्पोर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे, सागर ओरसे, पिंटू जाधव, बाळू शिंदे, या वेळी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन आणि सरकारची मदत नागरिकांना पोहचली नाही. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील शंकरशेठ कुऱ्हाडे यांनी “एक हात मदतीचा” म्हणून नागरिकांसाठी धान्य, तांदूळ, डाळी, साखर यासह दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे.



