क्रिडापिंपरीपुणेभोसरीमहाराष्ट्रमावळ

आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंचा क्रीडा मंत्र्यांकडून सन्मान

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज

श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत यशस्वी कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आपले दैनंदिन कामकाज सांभाळून सराव करणार्‍या या खेळाडूंच्या जिद्दीचे त्यांनी कौतुक केले. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हरिश्चंद्र थोरात यांनी 70 वर्षे वयोगटात धावणे व चालणे क्रीडा प्रकारात चार सुवर्णपदके जिंकली. खडकी कॅन्टान्मेंट बोर्डाचा कर्मचारी खेळाडू सचिन शिराळे याने आपल्या गटात 5 हजार मीटर चालणे प्रकारात कांस्यपदक जिंकले. महेंद्र बाजारे यांनी 55 वर्षे गटात 110 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक जिंकले. या तीन खेळाडूंचा क्रीडामंत्री भरणे यांनी सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय धावपटू धनंजय मदने, प्रा. अजय गाढवे आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button