पिंपरीचिंचवडभोसरीमावळ

आपत्कालीन यंत्रणेने दक्ष राहावे; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देश

 

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

पवना व मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणार्‍या पवना आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नदीकाठी राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

हवामान विभागाने पुढील काही तास धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पाऊस होण्याचा इशारा दिला असल्याने धरणातून होणार्‍या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवना आणि मुळा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्राजवळ कोणीही जाऊ नये, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

 

आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन कार्यवाही करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मदत व बचाव पथकेही आवश्यक उपकरणासह सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्तीमुळे उद्भवू शकणार्‍या परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे.

आग्निशामक विभाग महत्त्वाचे संपर्क क्रमांक

 

पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र – 9922501475

 

भोसरी अग्निशमन केंद्र – 9922501476

 

प्राधिकरण अग्निशमन केंद्र – 9922501477

 

चिखली अग्निशमन केंद्र – 8669694101

 

थेरगाव अग्निशमन केंद्र – 7030907999

 

रहाटणी अग्निशमन केंद्र – 9922501478

 

मोशी अग्निशमन केंद्र – 7264943333

 

तळवडे अग्निशमन केंद्र – 9552523101

पूर नियंत्रण कक्ष व इतर महत्त्वाचे क्रमांक

 

मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्ष – 020 28331111 / 020 67331111

 

अ क्षेत्रिय कार्यालय – 020 68334050

 

ब क्षेत्रिय कार्यालय – 020 68334300

 

क क्षेत्रिय कार्यालय – 020 68334500

 

ड क्षेत्रिय कार्यालय – 020 68334700

 

इ क्षेत्रिय कार्यालय – 020 68335000

 

फ क्षेत्रिय कार्यालय – 020 68335300

 

ग क्षेत्रिय कार्यालय – 020 68335500

 

ह क्षेत्रिय कार्यालय – 020 68335700

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button