चिंचवडपिंपरीपुणेभोसरीमहाराष्ट्रसांगलीसातारा

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड!

रवी लांडगे सत्तावीसवे महापौर

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज 

श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद यंदा भोसरी विधानसभेकडे गेले आहे. दोनवेळा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले भाजपचे रवी लांडगे यांची पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या शर्मिला बाबर यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला अद्याप १२ दिवसही पूर्ण न झाल्याने, भाजपाने राजकीय संवेदनशीलता जपण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात कोणताही जल्लोष किंवा फटाके न फोडण्याचे आवाहन भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, हितचिंतक यांना करण्यात आले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ किंवा ढोल-ताशांच्या गजरात न करता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीक असलेली ‘भारतीय संविधानाची प्रत’ देऊन करण्यात आले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button