पिंपरीचिंचवडपुणेभोसरीमावळराजकारण

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी देवेंद्र तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मान्यतेने, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी तायडे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाच्या मुंबईतील मुख्यालयात प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.

शहर निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, देवेंद्र तायडे त्यांच्या नेतृत्वात आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबुत होऊन, कार्यकर्ते आणखी जोमाने पिंपरी चिंचवडच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करतील. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया  सुळे, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार आणि वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करून पक्ष संघटना वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, तायडे हे पक्षाचे दुसरे शहराध्यक्ष आहेत. यापूर्वी माजी नगरसेवक तुषार कामठे हे शहराध्यक्ष होते. महापालिका निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याने त्यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजप पक्षातून राष्ट्रवादीत आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button