ओळखपत्राशिवाय महापालिका भवनात नो एन्ट्री
सुरक्षेसाठी प्रवेशद्वारावर होणार ओळखपत्राची तपासणी

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासह इतर कार्यालयात सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचारी व अधिकार्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देण्यास बंदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्वच कार्यालयांमध्ये प्रवेश करताना नागरिकांना गेटपास देऊन आणि गेटवरील ये-जा रजिस्टरला नोंदी घेवून आवश्यक त्या बाबींची तपासणी केल्यानंतर प्रवेश दिला जात आहे.
महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालय व इतर विभागांमध्ये आस्थापना, मानधन व कंत्राटी तत्वावर दहा हजारांपेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. विविध विभागास सामान्य प्रशासन प्रशासनाने अचानक भेट देऊन तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे जागेवर उपस्थित नसलेल्या, काम सोडून बाहेर फिरत असलेल्या, उशिराने येणार्या अशा बेशिस्त कर्मचार्यांवर पथक कारवाई करत आहे. सुरक्षारक्षक हे अधिकारी व कर्मचार्यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश देत असल्याची बाब तपासणी पथकाच्या निर्दशनास आली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांना ओळखपत्राशिवाय महापालिका भवनात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विविध कामांसाठी मुख्यालयात येणार्या अभ्यागतांनादेखील महापालिका भवनात गेटपास देण्यात येत आहे. हेल्मेट नसल्यास महापालिका भवनात दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जात नाही.
अशी आहे नियमावली
महापालिका कर्मचारी व अधिकारी, मानधन कर्मचारी, ठेकेदार संस्थाचे कर्मचारी यांना ओळखपत्राशिवाय महापालिकेच्या सर्वच कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. प्रवेश करताना तपासणी करुन नागरिकांना देणार गेटपास दिला जाणार आहे. मेट्रोने प्रवास करणार्या नागरिकांना महापालिका भवनात वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहन पार्किंग केवळ महापालिका अधिकारी, पदाधिकारी व कामानिमित्त येणार्या नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर सायंकाळी 6.15 नंतर नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.


