पुणे
सुनील नाईक यांचे निधन

पुणे । निर्भीडसत्ता न्यूज
पुण्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल (एसआरपीएफ) गट दोनचे वरिष्ठ हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक (वय 42) यांचे आजारपणामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई, फर्ग्युसन महाविदयालयाचा कर्मचारी भाऊ राहुल, पोलिस कर्मचारी बहिण ज्योती, काका, काकू असा मोठा परिवार आहे. ते सन 2006 पासून पोलिस दलात कार्यरत होते. ते खडकी येथील शिवशक्ती मित्र मंडळाचे पद भूषविले असून, सामाजिक कार्यात सक्रिय होते. खडकी शिक्षण संस्थेचे संचालक महादेव नाईक यांचे ते पुतणे होत.



