चिंचवडपिंपरीभोसरीमहाराष्ट्र

भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगेंचा अचानक राजीनामा  

विधानसभा निवडणुकीची गणिते जुळवण्याचा प्रकार 

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज

ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामा घेणे. नाराजांना मोठी पदे बहाल करणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे. त्यांचा फटका निवडणुकीत भाजपाला बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या कार्यकारी अध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली. त्या माध्यमातून त्यांचे बंड थंड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाकडून शहरातील सत्ता आबाधित ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानकपणे आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मागील दीड वर्षाहून अधिक काळ ते या पदावर कार्यरत आहेत. चिंचवड मतदार संघाचे महायुतीतील भाजपाचे उमदेवार आणि पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. विविध आंदोलने व उपक्रम युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राबविले आहेत. शहरात त्यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

निवडणुकीची गणिते जुळविण्याच्या ओघात भाजपने त्यांचा सारख्या पक्षाशी प्रामाणिक कार्यकर्त्यालाही पदावरून पाय उतार होण्यास सांगितले तर नाही ना? अशी चर्चा शहरात रंगत आहे.

पिंपरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक राहिलेले तुषार हिंगे यांचा पिंपरी, भोसरी, चिंचवड मतदार संघातही मोठ्या प्रभाव आहे. त्यांच्या सारख्या युवा नेत्याचा निवडणुकीच्या तोंडावर दिलेला किंवा घेण्यात आलेला हा राजीनामा निश्चितच पक्ष हिताचा आहे का? याचे चिंतन भाजप करेल आणि त्यातून बोध ही घेईल याची खात्री आहे.

 

वरिष्ठांच्या आदेशाचा मान राखत, पक्ष हितासाठी आपण राजीनामा देत आहे. पद हे साध्य नसून जनसेवेचे साधन आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी अशा अनेक पदांचा त्याग करण्याची तयारी आहे.

तुषार हिंगे, शहराध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा 

………

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button