चिंचवडपिंपरीपुणेभोसरी

साई सोशल फाउंडेशनतर्फे पुरस्कारांचे वितरण

 

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज

येथील साई सोशल स्पोटर्स फाउंडेशनतर्फे शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, कला, सांस्कृतिक, सामाजिक, पोलिस, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा गौरव करणार्‍या आला.

भोसरी येथील मास्टर माईंट स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते जगदीश चव्हाण व कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते तिरंगा जीनियस एशिया अ‍ॅवार्ड आणि तिरंगा जीनियस एशिया स्टुडण्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आले.

यावेळी अभिनेत्री तेजस्विनी वेताळ, स्वाती शहा, सुमित्रा बँकेचे अध्यक्ष योगेश गोंधळे, सहाय्यक आयुक्त सुनील हिरूरकर, उद्योजक आसिफ खान, फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान आदी उपस्थित होते. राम मुदगल, किरण माने, शिवांगी शर्मा, शीतल मारणे, सविता शिराळे, श्रीधरण तंबा, रफिक शेख, सुधा खोले, ऋषिकेश बारटेकी, दीपक कोहकडे, डॉ. प्रदीपा नायर, मनीषा जाधव, राजू मचे, डॉ. राज खतीब यांना सन्मानित करण्यात आले. सुधीर गडलिंग, प्रियांका चौहान, हेमराज थापा, काळूराम लांडगे, विष्णू पाटील, जागृती धर्माधिकारी, विकास खांदवे, सागर रसाळ, संतोष मुळे, दस्तगीर मणियार, कमलेश स्वामी, महेश मनगावडे, भरत वाल्हेकर, पल्लवी पाटील, मनोज साळवे, श्रीनिवास दुधाने, श्याम सहानी, महेश मंगवडे यांना पुरस्कार देण्यात आला. संयोजन फिरोज खान व सुनील साठे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button