इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्काराचे वितरण

निर्भीडसत्ता न्यूज
साई सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणार्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह,, प्रमाणपत्र, पदक, शाल व श्रीफळ हे पुरस्काराचे स्वरूप होते.
संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमदिर येथे झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या एकूण 50 व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध प्रशिक्षक गोपाल देवांग, माजी नगरसेवक मनीष आनंद, बॉबी करनानी, योगेश गोंधळे, सुनील हिरूरकर, कर्नल महादेव घुगे, जयंत हिरे, नीतू झा अर्चु मुकेश, परूल गुप्ता आदी उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज खान यांनी प्रास्ताविक केले.अॅनेट गोंसाल्विस यांनी सुत्रसंचालन केले.



