
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल व महर्षी विद्यामंदिर रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व धर्मराज पाल सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, महर्षी विद्यामंदिरच्या उपमुख्यध्यापिका श्वेता साहू मॅडम, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अरुण तांबे, मा.पोलिस निरीक्षक सुरेश भालेराव, काळेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पारधी, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे(बोधी), पुरुषोत्तम गाणार, आनंद बौद्ध बिहारचे महादेव कांबळे, बंशी शिंदे, भारतीय दलीत पँथरचे बाळासाहेब शेंडगे ,सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, युवराज प्रगने, सुधीर दुधमल, हर्षवर्धन कांबळे, ,शशिकांत शेलार,रामनाथ उगले, राजेंद्र खडसे ,वाय. डी. वाघमारे,डी. स. कोरे,भाऊरावकर दहागावकर, आर. डी भालेराव, बाजीराव भालेराव महर्षी विद्यामंदिरच्या ,ॲडमिन डिपार्टमेंट स्वप्नील पाल व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी संविधान रॅली शाळा-àछत्रपती श्री.शिवाजी महाराज चौकàविमल गार्डनàकोकणे चौकà शाळा अशी संविधान दिंडी काढण्यात आली. ह्या वेळी दोन्ही शाळेचे पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. छञपती शिवाजी महाराज ह्यांचा पुतळ्याला प्रमुख पाहुणे ह्यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या घोषणा दिल्या व सगळा परिसर दुमदुमून गेला .निशा पवार यांनी मराठीमध्ये संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. संविधानावरती इयत्ता आठवी व नववी विद्यार्थ्यांनी नाटक बसवले होते. संविधानदिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धाचे बक्षिक वितरण प्रमुख पाहुणे ह्यांचा हस्ते करण्यात आले. सामूहिक उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच 26/11 मुंबई अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समृद्धी वाघमारे आणि सारिका देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. चेतना देशमुख यांनी आभार मानले.



