दापोडीत २९ नोव्हेंबरला भरणार आरोग्यसेवेचा ‘महाकुंभमेळा’!
दुर्गाताई ठोकळ व सनराईस मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
या महाआरोग्य शिबिरात सर्व मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया तसेच दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शिबिराचे वैशिष्टय म्हणजे या शिबिरात महिलांसाठी ८७ रक्त तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. यामध्ये बाहेर ज्या चाचण्यांना सुमारे १५ हजार रुपयांहून अधिकचा खर्च येतो अशी जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने ३८ आजारांवरील रक्त चाचण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे.
तसेच गुडघ्याचे व मणक्याचे विना शस्त्रक्रिया मोफत उपचार, दिव्यांग व्यक्तींना मोफत इलेक्ट्रिक बायसिकल, मोफत एम.आर.आय, मोफत सिटी स्कॅन, मोफत चष्मे वाटप, मोफत औषध वाटप, कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवण यंत्र वाटप, दिव्यांग व्यक्तींकरिता व्हील चेअर, वॉकिंग स्टिक, वॉकर्स, जयपुर फुट व कॅलिपर्सचे मोफत वाटप, दिव्यांग व्यक्तीकरिता शिबिरामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरण या सर्व सुविधाही या शिबिरात देण्यात येणार आहेत.
तसेच या शिबिरामध्ये हृदय रोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण, किडनी विकार व प्रत्यारोपन, फाटलेली टाळू व ओठांवरील शस्त्रक्रिया, अनियमित रक्तदाब व शुगर तपासणी, किशोरवयीन मुलींना समुपदेशन, कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी, हाडांचे व मणक्यांचे आजार, बालरोग व शस्त्रस्क्रिया, कॉक्लियर इम्प्लांट, लिव्हर प्रत्यारोपन, लहान बालकांच्या हृदयातील छिद्राची शस्त्रक्रिया गुढघे प्रत्यारोपन, हिप प्रत्यारोपन, प्लॉस्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक उपचार, आयुर्वेदिक न्युरोथेरेपी, कयारोप्रैक्टिक थेरेपी, हिमोग्लोबीन तपासणी, मोफत अॅन्जोग्राफी, स्त्री रोग, दंतरोग, नेत्ररोग, आयुर्वेद, योगा, न्युरोपॅथी, उनानी सिध्दा, हॉमिओपॅथी या सर्व तपासण्या व शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार आहेत.
या शिबिरात महाराष्ट्र शासन, शासकीय जिल्हा रुग्णालय पुणे, रुबी हॉल क्लिनिक, संचेती हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल & रिसर्च सेंटर, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट, लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, ईशा नेत्रालयव्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, सिंहगड डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, knee veda क्लिनिक पॉसिबल, वेलनेस न्युट्रिशन सेंटर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र ही नामांकित रुग्णालये व त्यांचे डॉक्टर्स व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांकडे तसेच नागरिकांकडे ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक असून यामध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. तसेच आजारासंबंधीचे पूर्वीचे काही वैद्यकीय कागदपत्रे व मेडिकल रिपोर्ट असतील तर ते सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
दापोडी प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दुर्गाताई निरंजन ठोकळ यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, या शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी व नागरिकांनी ७७६८००३५३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपर्क क्रमांक ७७६८००३५३५ नाव नोंदणी करिता संपर्क करू शकतात



