पिंपरीउद्योग - व्यापारदेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमावळ

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘पाटील फिटनेस (PF)’चे भव्य उद्घाटन

डेरावलीत आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक युनिसेक्स जिम सुरू

डेरावलीत आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक युनिसेक्स जिम सुरू

डेरावली । निर्भीडसत्ता न्यूज | साबीर शेख

डेरावली परिसरातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची नवी दिशा देणारे अत्याधुनिक फिटनेस सेंटर ‘पाटील फिटनेस (PF)’ लवकरच सुरू होत असून, या भव्य युनिसेक्स जिमचे उद्घाटन 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून परिसरातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

डेरावली येथील विष्णू वंदन रेसिडेन्सी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या फिटनेस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. फिटनेस क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची उपकरणे आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांच्या सहाय्याने उभारलेले हे सेंटर परिसरातील युवक आणि नागरिकांसाठी आरोग्य व तंदुरुस्तीचे नवे केंद्र ठरणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्यास आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्यासह माजी विरोधी पक्षनेते प्रतिम म्हात्रे, श्रुती डेव्हलपर्सचे लक्ष्मण भाटेशरा, तसेच फिटनेस क्षेत्रातील लोकप्रिय एक्स्पर्ट आणि सेलिब्रिटी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा उद्घाटन सोहळा परिसरातील एक महत्त्वाचा सामाजिक कार्यक्रम ठरणार आहे.

पाटील बंधूंची समाजाभिमुख संकल्पना

‘पाटील फिटनेस सेंटर’ची संकल्पना पाटील बंधू रमाकांतशेठ पाटील आणि अविनाश पाटील यांची असून त्यांनी व्यवसायात नेहमीच समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून विविध उपक्रम उभारले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रात लोकप्रियता मिळवताना त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांबरोबरच आरोग्यदायी जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची असल्याची जाणीव ठेवली आहे. याच उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आधुनिक सोयी-सुविधांसह फिटनेसची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने ‘पाटील फिटनेस (PF)’ची स्थापना करण्यात आली आहे.

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज जिम

या फिटनेस सेंटरमध्ये आधुनिक जिममध्ये वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित फिटनेस ट्रेनर्स, सुरक्षित आणि प्रशस्त व्यायामाचे वातावरण तसेच आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे युवकांसह सर्व वयोगटातील नागरिकांना नियमित व्यायामाची सवय लागून निरोगी आणि तंदुरुस्त समाज घडविण्यास मोठी मदत होणार आहे.

नागरिकांसाठी प्रेरणादायी उपक्रम

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचाव्यात आणि नागरिकांनी तंदुरुस्त जीवनशैली स्वीकारावी, या उद्देशाने पाटील बंधूंनी उभारलेले ‘पाटील फिटनेस (PF)’ हे सेंटर परिसरातील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button