पिंपरीमहाराष्ट्रमावळराजकारण

“पिंपरीत पुन्हा; आपलेच आण्णा”!

पिंपरीत कार्यकर्त्यांकडून उमेदवार अण्णा बनसोडे यांचे जोरदार स्वागत

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांना सुरू असलेला पक्षांतर्गत डावलून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘पिंपरीत पुन्हा, आपलेच आण्णा’ म्हणत जोरदार जल्लोष केला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालपर्यंत पक्षांतर्गत तसेच महायुतीतून होत असलेला तीव्र विरोध डावळून अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना ही उमेदवारी दिली आहे. बनसोडे यांची उमेदवारी जाहीर होतात पिंपरीतील त्यांच्या कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. फटाके वाजवत तसेच पेढे भरवत समर्थकांनी मोठा जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल हे देखील उपस्थित होते.

पिंपरी विधानसभेतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही काम करणार नाही अशी भूमिका महायुतीतील इच्छुकांनी घेतली होती. काल तशी बैठक घेत काम न करण्याची शपथ देखील घेतली होती. मात्र त्यांचा विरोध असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता अजित पवार यांच्यासह अण्णा बनसोडे विरोध करणाऱ्या महायुतीतील इच्छुकांची नाराजी दूर करणार की यात कोणी बंडखोरी करणार हे पाहणं देखील तितकेच महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button