क्रिडाचिंचवडमहाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सचिन शिराळेचे यश

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघातील सचिन शिराळे याने 5 हजार मीटर चालणे क्रीडा प्रकारात तिसरा क्रमांक मिळवीत कांस्यपदक जिंकले. ही स्पर्धा श्रीलंका येथे महिंद्रा राजापक्षा स्टेडियम येथे झाली.
चाळीस वर्षावरील पुरूष गटातील या चुरशीच्या शर्यतीत सचिन शिराळे याने 34 मिनिटे 38 सेकंद अशी वेळ नोंदवत, कांस्यपदक जिंकले. त्याने 5 हजार मीटर धावणे आणि 3 हजार मीटर स्टिपलचेस क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. सचिन हा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचा कर्मचारी असून, तो खडकीतील पुणे अॅथलेटिक्स फाउंडेशनचा सदस्य आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अर्धमॅरेथान, अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभाग घेत पदके जिंकले आहेत. या यशाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.



