डिजिटल मिडीयामुळे काही सेकंदात जगभरात बातम्या पोहतात – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले
डिजिटल मिडीया कार्यशाळेचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौतुक करीत दिल्या शुभेच्छा

सोमनाथ साखरे
मेढा | निर्भीडसत्ता न्यूज
सध्या डिजिटल मिडीयाचे युग आले असताना त्याचे महत्व वाढले आहे. आजची बातमी वर्तमान पत्रात दुसऱ्या दिवशी वाचनात येत होती तसे आज राहीले नाही. आता काही घडल्यास सेकंदात ते जगभरात पोहचत आहे. त्यामुळे डिजिटल मिडीयाचा प्रवाह वाढले आहे. त्यामुळे बातम्या देताना पत्रकारांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे असे डिजिटल मिडीया पत्रकार संपादक संघटणेच्या कार्यशाळेला शुभेच्छा देताना बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.
सातारा येथिल छत्रपती शिवाजी महाराज कॉलेमध्ये डिजिटल मिडीया पत्रकार संपदक संघटणेच्या कार्यशाळेला बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले , संघटणेचे राज्यध्यक्ष राजा माने, जिल्हा माहिती अधिकारी तथा उपसंचालक पूणे श्रीमती वर्षा पाटोळे , छ. शिवाजी महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, संघटणेचे राज्य समन्वयक तेजस राऊत , राज्य सचिव महेश कुगावक, संघटणेचे प्रदेशाध्यक्ष (साप्ताहीक ) संजय कदम, राज्य सह सन्मवयक गणेश बोतालजी, राज्यसदस्य सचिन भिलारे, प. महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे, संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, सातारा शहराध्यक्ष अजित सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे उपस्थितीत दिप प्रज्वन करण्यात येवुन वृतपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्रा. डॉ. राजेंद्र मोरे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच संघटणेचे राज्याध्यक्ष राजा माने यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे यांनी आपल्या हातात दुधारी हत्यार तलवार हे शस्त्र आहे आणि ते दोन्ही बाजुने चालवता येते. त्याचा वापर हा जबाबदारीने करणे गरजेचे आहे, त्याचा अभ्यास असणे आवश्यक आहे असे सांगुन कोणतेही काम समाजापुढे लेहजा मांडण्याची कला शिकणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
श्रीमती वर्षा पाटोळे पुढे म्हणाल्या अधिकारी व पत्रकार हा समाजासाठी काम करणारा घटक आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे , डिजिटल युग आहे. प्रधानमंत्री यांनी डिजिडल इंडियाचा नारा दिलेला आहे. त्यावर आपण काम करीत आहोत असे सांगितले.
त्या पुढे अशाही म्हणाल्या की, एकादा मंत्री किंवा अधिकारी एकादी कॉम्परंस बोलवतो त्यावेळी त्याला आपल्या माध्यमातुन समाजातील जनतेला माहिती पोहचवायची असते कारण आपण माहिती पोहचविण्याचे वाहन असता परंतु त्यावेळी तसे न होता आपण त्यांच्यावर प्रश्नांची बंबारिंग करीत सुटता जनु ते जेलचे कैदी आहेत असेच आपण वागत असता तर असे न करता बोलवण्या मागचा उद्देश आपण समजावुन घेणे व तो समाजपर्यंत पोहविण्याचे काम करणे गरजेचे आहे असे मत श्रीमती पाटोळे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलताना संघटणेचे राज्यध्यक्ष राजा माने म्हणाले डिजीटल मिडीया सध्या गतीने वाढत आहे. डिजीटल मिडीयाला नाव नाही, चेहरा नाही परंतु त्याचा प्रभाव मात्र दिसुन येतो. तरीही राज्य व केंद्र सरकार याबाबत कॅम्पुज असल्याचे सांगुन बीडचे प्रकरण प्रथम डिजिटल मिडीयाने जनतेसमोर आणले नंतर प्रस्तापित मिडीयाने ते उचलुन धरले याची आठवण करून दिली.
ते पूढे म्हणाले आमचे शक्ती प्रदर्शन नाही. कोणाशी स्पर्धा नाही आणि मिरविण्यासाठी तर मुळीच नाही तर ही संघटणा ईतिहास घडविण्यासाठी आहे. पूर्वी पत्रकारांची नावे घेतली जायाची आता ते मागे पडले असुन आता फक्त कोणता ईशु आहे याबाबतची नावे घेतली जातात असे राजा माने यांनी सांगितले.
राजा माने पुढे म्हणाले कार्यशाळा म्हणजे काय तर स्पष्टपणे विचारलेल्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे होय आणि आजची कार्यशाळा सुंदर केल्याबद्दल अभिनंदन करून प्रत्येक जिल्हयात अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ज्या वेळी आपणास कोणतीही मदत हवी असेल त्यावेळी ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे सांगुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्हातुन जेष्ट पत्रकार अजित जगताप तसेच डिजिटल मिडीया पत्रकार संपादक सघटणेचे सातारा जिल्हा कार्यकारीणी तसेच तालुकाध्यक्ष त्यांची कार्यकारीणी व सदस्य आणि जिल्हयातील पत्रकार बांधवांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. संपदा जगताप तर आभार जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे यांनी मानले.




